Saturday, June 20, 2020

'पतंजलीने आपल्या भाष्यात 'योगशास्त्रे सांख्य प्रवचने' म्हणून मान्य केलंय'

प्रकाश कामत,
पणजी- आंतरराष्ट्रीय योगदिवसाच्या निमित्ताने योगच्कांय उगमा विषयी काही महत्वाची माहिती ट्वीटर ह्या समाज माध्यमावर मिळाली. ती लेखक @Manoj2211Khare यांच्या सौजन्याने देत आहे. अज्ञान्यांचे अज्ञान अथवा बुद्धीपुरस्सर  होणारा बुद्धीभेद दूर व्हावा व माहितगारानां चर्चेस वाव मिळावा हा हेतू:

योगदिनाच्या निमित्ताने काही महत्वपूर्ण:
योगशास्त्राचा जनक म्हणून पतंजली (इसवी पूर्व 2रे शतक) ला खपवले जाते. पण फार कमी लोकांना ठाऊक आहे की पतंजली योगशास्त्र तक्षशिला या विद्यापीठात शिकला. स्वतः पतंजलीने आपल्या भाष्यात 'योगशास्त्रे सांख्य प्रवचने' म्हणून मान्य केलं असून याचा अर्थ
योग हे सांख्याचे आहे असा होतो. सांख्य दर्शन हे निरीश्वरवादी दर्शन असून कपिलमुनी हे या तत्वज्ञानाचे प्रवर्तक आहेत. या उलट कौटिल्य आपल्या अर्थशास्त्रात योग हा बृहस्पतीचा असल्याचं म्हणतात. बृहस्पती हे चार्वाक परंपरेतून येतात, आणि ही परंपरा देखील निरीश्वरवादीच आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीला हायजॅक करू पाहणाऱ्या ब्राह्मण्यवाद्यांना आता हा प्रश्न आहे माझा की, सांख्य निरीश्वरवादी, बृहस्पती निरीश्वरवादी, ज्यांना आद्य शंकराचार्यांनी आपल्या शांडकरभाष्य या ग्रंथात 'योगाणाचक्रवर्ती' म्हटलं ते बुद्ध ही निरीश्वरवादी, मग हा योग नक्की कोणाचा? वैदिकांचा की अवैदिकांचा?मला ईश्वर या संकल्पनेत किंवा कोणाच्या आस्थेत लुडबुड करायची नाहीये. प्रत्येकाने प्रत्येकाचे श्रद्धास्थान यथायोग्य आणि मानाने जपावेत, किंबहुना तो तुमचा जन्मदत्त अधिकार ही आहे. मला हा प्रश्न फक्त ब्राह्मण्यवाद्यांना विचारायचं आहे. अपप्रचार थांबावेत ही यामागील भावना. 😊


No comments:

Post a Comment